PM Internship Scheme Phase 3 Pune:
PM Internship Scheme 2026: १० वी, १२ वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६ पुणे’ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली असून देशभरात ३१ हजार ४८० पेक्षा अधिक संधी उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील पात्र उमेदवारांना बजाज ऑटो आणि ज्युबिलंट फूडवर्क्ससारख्या नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी दरमहा ९,००० रुपये विद्यावेतन दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना नोंदणी’ प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
PMIS Registration Portal MCA Gov In :
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१ हजार ४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेंतर्गत १८ ते २५ वर्षे वय, भारतीय नागरिकत्व असलेले, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

रिक्त जागांची संख्या
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमध्ये पुणे जिल्ह्यामधील ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (१९२), बजाज ऑटो लि. (३०९), भारत फोर्ज (७), रिलायन्स इंडिस्ट्रीज लि. (३३), टेक महिंद्रा (४२), स्कोडा ऑटो व्होल्क्सवॅगन इंडिया प्रा. लि. (१९), इमामी लि. (१५), फिनोलेक्स केबल्स लि. (६०), कॉग्नीझंट टेक्न्कॉलॉजी सोल्युशन्स इं. प्रा. लि. (१४), पिरामल फार्मा लि. (१) आदी नामांकित कंपन्यांमध्ये रिक्तपदांसाठी उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. तरी या कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे https://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२०-२६,१३३६०६, वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
PM Internship Scheme 2026: १० वी, १२ वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
Eligibility Criteria for PM Internship Scheme: अर्ज करण्यासाठी पात्रता आणि अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
पात्रतेचे निकष:
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे.
- नागरिकत्व: उमेदवार भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे.
- शैक्षणिक पात्रता: किमान १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर.
- अपात्रता नियम: पूर्णवेळ नोकरी करत असलेले किंवा नियमित (Regular) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यासाठी अपात्र आहेत. मात्र, जे तरुण ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण (Distance Education) घेत आहेत, ते अर्ज करू शकतात.
PM Internship Scheme 2026: १० वी, १२ वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!